भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्हा पुन्हां बनतोय कोरोना हॉटस्पॉट ! आज पुन्हा नविन ५७१ बाधित रुग्णांची नोंद !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५७१ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि चाळीसगांव तालुक्यात आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १४१ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ७८ रूग्ण हे चाळीसगांवचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर १६, जळगाव ग्रामीण ४७, जामनेर ३० , पाचोरा १४, भुसावळ २८, अमळनेर १७, चोपडा ५६, भडगाव ९, धरणगाव ४०, यावल १७, एरंडोल १७, पारोळा ३०, मुक्ताईनगर २१, बोदवड ०, अन्य जिल्हा १० असे रूग्ण बाधित आढळले आहे.

जिल्ह्यात आजवर एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १५९६२ इतका झालेला आहे. यातील १०९८१ रूग्ण बरे झाले आहेत. आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६२७ इतकी  तर उपचार घेत असलेले ४३५४ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!