जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३८ रुग्ण कोरोना बाधित !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १३८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १३८ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३९, भडगाव ५, यावल १३, जळगाव ग्रामीण ६, रावेर १०, चाळीसगाव १, पाचोरा १, जामनेर ११, चोपडा ११, पारोळा ५, अमळनेर ७, धरणगाव १, बोदवड १९, मुक्ताईनगर १, भुसावळ १३, एरंडोल ३, जामनेर ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.
आजच्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ३७२० इतकी झालेली आहे