भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यात आज नविन २८१ रुग्णांची नोंद !

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २८१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २८१रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८८ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज एरंडोल शहर २७ जामनेर १६, चाळीसगाव ११, रावेर १२, भुसावळ २१, आणि मुक्ताईनगर १७, जळगाव ग्रामीण २२, अमळनरे ९, चोपडा २२, पाचोरा १४, धरणगाव २, पारोळा २, बोदवळ ०, भळगाव ९, यावल ७ ,इतर २ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ९७३२ इतका झालेला आहे. यातील ६२९१ रूग्ण बरे झाले आहेत. आज ७ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४६७ इतकी  तर उपचार घेत असलेले २९७४ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!