भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ११३९ जणांना कोरोनाची बाधा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाचा विस्‍फोट सुरूच असून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११३९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९९६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – २८३, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ- ७७, अमळनेर-९३, चोपडा-२७७, पाचोरा-३५, भडगाव-२०, धरणगाव-५६, यावल-२८, एरंडोल-४९, जामनेर-३३, रावेर-२१, पारोळा-१८, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-११, बोदवड-१७, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण ११३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ८९ हजार ०१८ पर्यंत पोहचली असून ७५ हजार ५९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १६२५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११८०३ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!