जळगाव जिल्ह्यात आज २४४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २४४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २४४ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ४३ रूग्ण हे एरंडोल शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज जळगाव शहर ४२, जामनेर २१, चाळीसगाव १२, रावेर १२, भुसावळ १४, आणि मुक्ताईनगर ९, जळगाव ग्रामीण ९, अमळनरे ८, चोपडा ७, पाचोरा २, धरणगाव ३, पारोळा १६, बोदवळ ७, भळगाव १५, यावल २२ ,इतर २ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ८८४९ इतका झालेला आहे. यातील ५६३० रूग्ण बरे झाले आहेत. आज १३ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४४० इतकी तर उपचार घेत असलेले २७७९ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.