भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज २७६ रुग्ण पॉझिटिव्ह; ५०१ कोरोना मुक्त

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात २७६ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून ५०१ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ३१, अमळनेर १०, चोपडा ६, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव ३, यावल ३, एरंडोल ५, जामनेर १०६, रावेर १०, पारोळा ०, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर २, बोदवड ० आणि इतर जिल्हातील ६ असे एकुण २७६ रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्ण संख्या ४९७११ झाली असून त्यातील ४४३०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांची संख्या १२०६ पोहचली आहे. तसेच ४२०३ रूग्ण उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा ८९.१२ टक्क्यांपर्यंत आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!