जळगाव जिल्ह्यात आज ४१२ कोरोना पॉझिटिव्ह; ५४१ रुग्ण बरे !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ४१२ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर ६२, जळगाव ग्रामीण ८, भुसावळ ५५, अमळनेर ३४, चोपडा ७०, पाचोरा २१, भडगाव ४, धरणगाव १९, यावल २८, एरंडोल २९, जामनेर १७, रावेर ९, पारोळा ७, चाळीसगाव ३२, मुक्ताईनगर १, बोदवड ७ आणि इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण ४१२ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४७१५४ इतका झालेला आहे. यातील ३८०९३ रूग्ण बरे झाले आहेत. आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ११६२ इतकी तर उपचार घेत असलेले ७८९९ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.