जळगाव जिल्ह्यात आज ४४३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यात आज ४४३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून आजच ४६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार आज जळगाव शहर ६३, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ २०, अमळनेर २२, चोपडा १४, पाचोरा ४, भडगाव ६, धरणगाव ३, यावल ७, एरंडोल ७, जामनेर ११३, रावेर १३, पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर १४१, बोदवड ० आणि इतर जिल्हातील ३ असे एकुण ४४३ रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित ५०६६५ रूग्ण आढळून आले असून ४५७७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज ७ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा १२१८ झाला आहे. तर जिल्ह्यात आता ३६७२ रूग्ण उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा ९०.३५ टक्क्यांपर्यंत आला आहे.