जळगाव जिल्ह्यात आज ४८६ रुग्ण कोरोना मुक्त; नविन १४० पॉझिटिव्ह
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण १४० रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले असून ४८६ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले आहे
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर ४७, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ३७, अमळनेर ४, चोपडा ८, पाचोरा २, भडगाव २, धरणगाव १, यावल ३, एरंडोल २, जामनेर ८, रावेर ५, पारोळा ४, चाळीसगाव १०, मुक्ताईनगर ०, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १४० रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५०९२६ रूग्ण आढळून आले असून ४६७१५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण १२२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आता २९९० रूग्ण उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा ९१.७३ टक्क्यांपर्यंत आला आहे. .