आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ४९२ कोरोना पॉझिटिव्ह; ६६० रुग्ण बरे !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ४९२ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात जळगाव शहरातील १४७, जळगांव ग्रामिण २४, भुसावळ १६९ , अमळनेर १४ , चोपडा १२,पाचोरा १३, भडगाव  २,धरणगाव ३, यावल १०, एरंडोल ८, जामनेर ११ , रावेर १४, पारोळा ६,चाळीसगांव ४१, मुक्ताईनगर १७, बोदवड ०, इतर जिल्ह्यातील १ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४७६४६ इतका झालेला आहे. यातील ३८७५३ रूग्ण बरे झाले आहेत. आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ११६६ इतकी  तर उपचार घेत असलेले ७७२७ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!