भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ७८३ कोरोनातुन बरे; नविन ४४३ पॉझिटिव्ह

जळगाव (प्रतिनिधी)। आज जिल्ह्यात नवीन ४४३ कोरोना बाधीत आढळून आले आहे. यासोबत आज जिल्ह्यातील ७८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक ११४ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल जळगाव ग्रामीणी ६, भुसावळ ५३, अमळनेर ४१, चोपडा ४३, पाचोरा १४, भडगाव १०, धरणगाव ७, यावल २५, एरंडोल १२, जामनेर १९, रावेर ३३, पारोळा ११, चाळीसगाव ३८, मुक्ताईनगर ४, बोदवड १२ आणि इतर जिल्ह्यांतील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४५८७२ इतका झालेला आहे. यातील ३५९६१ रूग्ण बरे झाले आहेत. आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ११३७ इतकी  तर उपचार घेत असलेले ८७७४ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!