भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ८०३ रुग्ण बरे; नविन ४४६ कोरोना पॉझिटिव्ह !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ४४६ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि पारोळा तालुक्यात आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर १४०, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५५, अमळनेर ११, चोपडा ५३, पाचोरा ७, भडगाव १४, धरणगाव २४, यावल ५, एरंडोल ५, जामनेर २२, रावेर ११, पारोळा १०, चाळीसगाव २८, मुक्ताईनगर १९, बोदवड ७ व ईतर जिल्ह्यांमधील ९ असे एकुण ४४६ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४५४२९ इतकी झालेली आहे. यातील ३५१७८ ग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ०४ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२९ इतका झालेला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!