भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ८७८ रुग्णांची कोरोनावर मात; २६१ पॉझिटिव्ह !

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज ८७८ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून २६१ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर २८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २६, अमळनेर ३२, चोपडा १६, पाचोरा ९, भडगाव ७, धरणगाव १९, यावल ४, एरंडोल ३, जामनेर २१, रावेर २९, पारोळा ७, चाळीसगाव ३९, मुक्ताईनगर ११, बोदवड ४ आणि इतर जिल्ह्यांतील २ असे एकुण २६१ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४७९०७ इतका झालेला आहे. यातील ३९६३१ रूग्ण बरे झाले आहेत. आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ११७५ इतकी  तर उपचार घेत असलेले ७१०१ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!