जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान आज आणखी २५३ रुग्ण बाधित !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २५३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २५३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज जामनेर ३०, चाळीसगाव २६, रावेर २१, भुसावळ २० आणि मुक्ताईनगर १९ , जळगाव ग्रामीण १३, अमळनरे १, चोपडा १२, पाचोरा ८, धरणगाव ९, एरंडोल ३, पारोळा १२, बोदवड १२, यावल २ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५७२४ इतका झालेला आहे. यातील ३३८३ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१४१४; कोविड हॉस्पीटलमध्ये-१२७ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४६९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३२१ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे