जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वेगात; आज तब्बल ४०८ कोरोना पॉझिटिव्ह
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धाकधूक वाढवणारा समोर येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १९१, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ- २१, अमळनेर- २०, चोपडा-५३, पाचोरा-१३, भडगाव-०५, धरणगाव-०९, यावल-०२, एरंडोल-०३, जामनेर-३३, रावेर-०७, पारोळा-१२, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ४०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६० हजार ८७८ पर्यंत पोहचली असून ५६ हजार ९८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १३८५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २५०५ रुग्ण सध्या उपचार घेताय.