जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर;तब्बल ४९२ पॉझिटिव्ह !
जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर पडली असून जिल्ह्याची चिंताजनक वाढवणारी आकडेवारी आली आहे आज तब्बल 492 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1389 रुग्णांचा मृत्यू ओढवला.
आजची संख्या-
जळगाव शहर 124, जळगाव ग्रामीण 53, भुसावळ 27, अमळनेर 02, चोपडा 73, पाचोरा 05, भडगाव 03, धरणगाव 13, यावल 02, एरंडोल 17, जामनेर 37, रावेर 18, पारोळा 08, चाळीसगाव 80, मुक्ताईनगर 18, बोदवड 07, अन्य जिल्हा 05
जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 766 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 57 हजार 252 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 144 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.