भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

जावयानेच मारला सासऱ्यांच्या घरात डल्ला, घरफोडी करून रोख रकमेसह ३३ तोळे सोने लंपास

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून ३३ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण २८ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरीला गेला होता. दरम्यान ही चोरी त्यांच्या जावयानेच केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून २१ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अनिल हरी ब-हाटे (वय ६४) हे भुसावळ येथील सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी येथे राहतात. पुतण्याचे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम असल्याकारणामुळे बऱ्हाटे दाम्पत्य २ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी २ वाजता घर बंद करून हळदीच्या कार्यक्रमाल गेले होते.

त्यावेळी संशयित आरोपी राजेंद्र झांबरे हा देखील हळदीच्या कार्यक्रमात होता. त्याने बाहेर जाऊन येतो असे सांगून तो थेट सासरे अनिल बऱ्हाटे यांच्या घरी गेला. त्याने घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून चोरटा घरात शिरला. दि. २ रोजी दुपारी घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये रोख असा एकूण २८ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, या संदर्भात पोलिसांचा चौकशीत अनिल हरी बऱ्हाटे यांचा जावई राजेंद्र झांबरे हा कर्जबाजारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजेंद्र शरद झांबरे (रा.फेकरी, तालुका भुसावळ.) याला ताब्यात घेतले. त्याला खाकी दाखवताच सासऱ्याच्या घरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, त्याच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मालापैकी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २ लाख ६० हजार रुपये रोख असा एकुण २१ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. सदर आरोपीताने गुन्हयातील गेलेल्या मालापैकी इतर १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे चोरी केल्याचे कबुली दिली असुन मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

सदर गुन्हा पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो. उपनिरी. मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा यांचे पथकाने उघडकीस आणला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!