भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जिल्हा कोविड सेंटरमधून संशयित बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । येथील कोविड रुग्णालयात शुक्रवारी एक ८० वर्षीय संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकाराने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. या रुग्णाचे स्वॅब घेण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे़.

पाचोरा तालुक्यातील एका ८० वर्षीय वृद्धला संशयित म्हणून कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़. परिचारिकांनी सकाळी राऊंड घेतला असता सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा रुग्ण आढळून आला नाही़. तत्काळ या रुग्णाचा इतर कक्षांमध्ये चौकशी करून शोध घेण्यात आला. मात्र हा संशयित आढळून आला नाही. यानंतर ओट्याखाली, स्वच्छतागृहांमध्ये तपासणी करण्यात आली मात्र, तेथेही हा संशयित मिळाला नाही. दरम्यान आज नवनियुक्त जिलाधिकारी राऊत यांनी दुपारी कोविड सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान, प्रशासक डॉ़. बी़. एऩ. पाटील यांना समजल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी आम्ही आधीच कळविल्याचे डॉक्टर्सनी स्पष्ट केले. या घटनेनंतर अखेर प्रत्येक रुग्णाला ड्रेसकोड त्यावर पॉझिटीव्ह, संशयित असा उल्लेख व प्रत्येकाच्या हातावर शिक्का असे नियोजन करा, किती रुग्ण, किती ड्रेस लागतली, कोण शिवून देणार याबाबत माहिती द्या, अशा सूचना प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांनी तातडीने दिल्या आहेत़. जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अधिष्ठाता यांचे पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार आम्ही चौकशी सुरु केली आहे. पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी नागरदेवळा येथे टिम पाठवली असता तेथे हा रुग्ण आढळून आलेला नाही. खबरी, पोलिसांना त्या रुग्णांचा फोटो पाठविण्यात आला असून सर्वत्र शोध घेण्यात येत आहे. त्यांचे नातेवाईक उल्हास नगर येथे राहतात तेथेही चौकशी करण्यात आली असता ते आढळून आलेले नाहीत. या रुग्णाचे स्वॅब घेऊन दोन दिवस झाले आहेत मात्र, अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. दरम्यान, जर रुग्ण पळून जात असतील व सापडत नसतील तर रुग्णालयात सुरक्षा पुरविणाºया सुरक्षा एजन्सीवर गुन्हे दाखल करा, अशा सूचनाही डॉ. बी. एन. पाटील यांनी सर्वांना यावेळी दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!