भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्ण संख्या ६०० पार !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढ असून आज पुन्हा बाधित रुग्ण संख्येने सहाशेचा टप्पा ओलांडला असून आज तब्बल ६१० नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. तर आज दिवसभरात ३२७ रूग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जिल्ह्यात जळगाव शहर 334, जळगाव ग्रामीण 30 , भुसावळ 38 ,अमळनेर 11, चोपडा 67 ,पाचोरा 02, भडगाव 03 ,धरणगाव 10,यावल 04,एरंडोल 03,जामनेर 02, रावेर 27, पारोळा 16 , चाळीसगाव 15,मुक्ताईनगर 26, बोदवड 19आणि इतर जिल्ह्यातील 03 असे एकूण 610 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 64032 इतकी झालेली असून आतापर्यंत एकूण 58222 रूग्ण बरे झालेले आहे.आज दिवसभरात 327 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 4407 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आज 2 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1403 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!