जिल्ह्यात आज ५३२ रुग्णांची कोरोनावर मात; ५४१ नविन कोरोना बाधित !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५४१ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि पारोळा तालुक्यात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक ११७ रूग्ण हे जळगाव शहरातील आढळून आले असून याच्या खालोखाल ९० रूग्ण हे अमळनेर तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता जामनेर ५७, रावेर ५, जळगाव ग्रामीण २९, पारोळा २४, पाचोरा ८, भुसावळ ३५, चोपडा ५७, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल १०, एरंडोल ३१, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर १२, बोदवड ११, अन्य जिल्हा ५ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा २८१३२ इतका झालेला आहे. यातील २०२६८ रूग्ण बरे झाले आहेत. आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ८२२ इतकी तर उपचार घेत असलेले ७०४२ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.