जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वेगाने सुरू; आज पुन्हा ९५४ रुग्णांची भर !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आज पुन्हा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून जिल्ह्यात आज ९५४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जळगाव शहर- ३१०, जळगाव ग्रामीण-४२, भुसावळ-७०, अमळनेर-१८, चोपडा-१२१, पाचोरा-१७, भडगाव-२१, धरणगाव-५७, यावल-३०, एरंडोल-९८, जामनेर-३१, रावेर-९, पारोळा-७, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातून ४ असे एकुण ९५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ६७ हजार ६८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार २४८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज एकुण ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.