जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर; ११२४ बाधितांची नव्याने नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११२४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा वाढतच असून ही चिंताजनक आहे तर कालही एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत.
जळगाव शहर – ४००, जळगाव ग्रामीण-२७, भुसावळ- १२३, अमळनेर-१५, चोपडा-२५६, पाचोरा-२९, भडगाव-००, धरणगाव-४८, यावल-०३, एरंडोल-२८, जामनेर-४८, रावेर-२९, पारोळा-३४, चाळीसगाव-४०, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२२, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ११२४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ८४ हजार २८९ पर्यंत पोहचली असून ७१ हजार ७७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५६९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९४२ रुग्ण सध्या उपचार घेताय.