जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या डबल मर्डर प्रकरणी अवघ्या बारा तासात आरोपी ताब्यात !
रोझोदा .ता.रावेर (प्रतिनिधी)। येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी ओंकार पांडुरंग भारंबे वय 90 व सुमानबाई ओंकार भारंबे वय 84 या दोघ पती-पत्नीची धारदार हत्याराने पोटावर व गळा चिरून हत्त्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी सदरील क्षेत्र प्रतिबंधीत असल्याने आरोग्यसेवक या क्षेत्रातील नागरिकांची तपासणी निमित्त गेले असता उघळकीस आली,
या दुहेरी हत्त्याकडाने परिसरात मोठी खडबड उडाली . सदरील घटनेच्या तपास संदर्भात जळगाव येथुन श्वान पथक मागविण्यात आले ते जुना फैजपूर रस्त्याने जाऊन परत मयताच्या घराजवळच आले ,पोलिसांनी तपासला वेग देऊन सपोनी राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं अवघ्या बारा तासात परेश खुशाल भारंबे वय 32 या संशयिताला अटक केली . घटनास्थळी जिल्हापोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पो.अधीक्षक भाग्यश्री नवटके, डी वाय एस पी गजानन राठोड यांनी भेट दिली.या बाबत सावदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि राहुल वाघ व राजेंद्र पवार हे करीत आहे.