डिजी लोन प्रलंबिततेबाबत पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष ब्राम्हणे याच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन !
यावल (प्रतिनिधी)। एक वर्षांपासून महाराष्ट्रातील सुमारे 3 हजार पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे प्रलंबित असलेले DG लोन तात्काळ देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज दिनांक 21/8/2020 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा जळगाव जिल्हा यांचे वतीने जिल्हाधिकारी जळगांव यांचे मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे,जिल्हा उपाध्यक्ष-मगलसिंग राजपूत जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील,जळगांव महानगर अध्यक्ष- किरण राजपूत, भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी,
चोपडा तालुका अध्यक्ष मुन्ना ठाकूर,पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख,चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनावणे, इंजी अभयराजे शिंदे, अक्षय वडनेरे,हर्षल तावडे,कुंदन शिरूड,केतन चौधरी, आकाश काटे व पदाधिकारी उपस्थित होते.