भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

तज्ज्ञांनी व्यक्त केलं मत–कोरोनावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन नाही तर ‘हा’ आहे उत्तम पर्याय..

मंडे टू मंडे वृत्त संकलन ।

मुंबई (प्रतिनिधी)3 एप्रिल: मार्च महिन्यात कोरोनाचा झपाट्यानं झालेला प्रसारा पाहाता पुन्हा एकदा लॉकडाऊनची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही जाहीर झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जनतेसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की कोरोनाची अशीच स्थिती राहिल्यास मी लॉकडाऊन लावण्यास नकार देऊ शकत नाही. मात्र, लॉकडाऊन खरंच किती प्रभावी आहे, याबाबतही अनेक अंदाज व्यक्त केले गेले आहेत. अशात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता कानावर येत असल्यानं हे कितपत प्रभावी आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मागील वर्षीदेखील लॉकडाऊन कोरोनाची प्रकरण रोखण्याऐवजी त्यानं सर्वोच्च बिंदू गाठू नये, यासाठी करण्यात आलं होतं. आकड्यांनुसार, मागील वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित करुनही रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सरकारनंच आपल्या रिपोर्टमध्ये असा उल्लेख केला आहे, की लॉकडाऊन नसतं तर रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असती. म्हणजेच कोरोना रुग्णसंख्येचा उच्चबिंदू सप्टेंबरमध्ये नोंदवला गेला तो त्याआधीच आला असता आणि आरोग्य यंत्रणा यासाठी पूर्णपणे तयार नव्हत्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन महामारीच्या रोखण्याचं प्रभावी साधन आहे मात्र ते सुरुवातीच्या टप्प्यात. म्हणजेच जसं मागच्या वर्षी केलं गेलं होतं. त्यावेळी रुग्णसंख्येचा पीक टाळण्यासाठी सरकार यशस्वी ठरलं होतं. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. मागील वेळी रुग्णसंख्या 10000 हून 80000 वर पोहोचण्यासाठी तीन महिन्यांचा काळ लागला होता. मात्र, यावेळी हाच काळ कमी होऊन एक महिना दहा दिवसांवर आला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनपेक्षा टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन हे कोरोनाला रोखण्यासाठीचे उत्तम पर्याय आहेत. याच कारणामुळे जगभरातील सरकार हाच पर्याय निवडत आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता –
भारतात सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत पाहायला मिळत आहेत. सरकारनं प्रतिबंध लावूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यात कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अशात लॉकडाऊनऐवजी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन हा पर्याय वापरले तर रुग्णसंख्या कमी करण्यात ते अधिक फायद्याचे ठरतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!