क्राईमरावेर

दहा रुपये दिले नाही म्हणून प्रौढांच्या हाताची करंगडी मोडली

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर (प्रतिनिधी)। दारू प्यायची सवय असल्याने दारू पिलेली असताना पुन्हा दारू पिण्यासाठी १० रूपये दिले नाही म्हणून दारूच्या नशेत एकाने प्रौढाला मारहाण करून हाताची करंगळी मोडल्याची घटना रावेर तालुक्यातील लालमाती येथे घडली .

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रामसिंग मोहन पवार (वय-५५) रा. लालमाती ता. रावेर ही व्यक्ती शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास शरीफ माजीत तडवी रा. लोहारा, ता. पाचोरा हा कामाच्या निमित्ताने गावात आला असता दुपारी रामसिंग पवार यांच्याकडे शरीफ तडवी याने दारूच्या नशेत, दारू पिण्यासाठी १० रूपये मागितले. रामसिंग पवार यांनी पैसे न दिल्याने याचा राग येवून संशयित आरोपी शरीफ तडवी याने रामसिंग पवार याला मारहाण करत डाव्या हाताच्या करंगळी वाकवून दुखापत केली. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी शरीफ तडवी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!