भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

धक्कादायक; चिनावलकारांची चिंता वाढवतोय कोरोना पुन्हा 5 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित !

चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे. आज सकाळी गावातील एकाच परिवारातील 5 रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील दोन महिला 25 वर्षीय, 28 वर्षीय तर दोन मुले 15 वर्षीय, 8 वर्षीय असुन एका 38 वर्षीय पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे. सदरील रुग्णांच्या घरातील वयस्कर महिला आधीच कोरोना बाधित आढळून आली आहे. आता पुन्हा पाच अहवाल बाधित आढळून आल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. सदरील सर्व रुग्ण चिंचवाडा परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाइन करण्यात येत असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाने गावच्या सरपंच सौ.भावना योगेश बोरोले यांच्या कडून दुजोरा मिळाला असुन योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.

चिनावल गावांतील कोरोना बाधित रुग्ण संख्या 29 असुन त्यात 2 मयत आहेत

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!