भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

धक्कादायक; दवाखान्यात काम विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरकडुन विनयभंग

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे (प्रतिनिधी): दवाखान्यात काम विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगरमध्ये घडली आहे. संबंधित डॉक्टरने महिलेला तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. ही घटना काल सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमध्ये डॉ. मंदारचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. काल सकाळी एक महिला दवाखान्यात काम आहे का, असे विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी डॉ. मंदारने संधी साधून तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो, असे म्हणत महिलेच्या अंगाला स्पर्श केला. त्यानंतर त्याने ड्रॉव्हरमधील पैसे दाखवून महिलेला दुपारी दीड वाजता येता का अशी विचारणा करीत विनयभंग केला आहे. याप्रकरणी डॉ. मंदार रमेश अत्रे (वय ४८, रा. अमृतसिद्धी सोसायटी, कर्वेनगर) वरती गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!