आरोग्यजळगाव

धोका वाढतोय ! जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा ५७४ बाधित रुग्णांची नोंद !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५७४ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि अमळनेर तालुक्यात आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १६८ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ८९ रूग्ण हे अमळनेर आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर १४, जळगाव ग्रामीण २४, जामनेर ३१, पाचोरा २५, भुसावळ २२, अमळनेर ७, चोपडा ६, पारोळा ३९, भडगाव ९, धरणगाव ३२, यावल २३, एरंडोल ४, चाळीसगाव २१, मुक्ताईनगर ३, बोदवड १, अन्य जिल्हा ५ असे रूग्ण आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १६५३६ इतका झालेला आहे. यातील ११३२५ रूग्ण बरे झाले आहेत. आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६३८ इतकी  तर उपचार घेत असलेले ४५७३ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!