भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

नवीन पेन्शन योजना रद्द करा व जुनी पेन्शन योजना लागू करा रा.यु.काँ शिक्षक संघटना व स्वपक्षाच्या मागणी

खिर्डी ता,रावेर (प्रतिनिधी)। नवीन पेंशन योजनेची हजारो कोटिंची रक्कम शेतकरी हितासाठी वापरा आणी जुनी पेंशन लागू करा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांना रा.यु.कॉ. रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या व स्वपक्षाच्या वतीने निवेदन दिले.

राज्यात १ नोव्हें. २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करणेबाबत निवेदन सादर केले. यात नवीन पेंशन योजनेंतर्गतची हजारो कोटींची शेअर मार्केट मध्ये गुंतवलेली रक्कम शेतकरी हितासाठी वापरण्याची मागणी ही करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे कैलास घोलाणे, विनायक चौथे, विजय गोसावी, नितीन माळी, विश्वेश डोळे व अनेक कर्मचारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जळगांव जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील लाखों कर्मचारी जी जुनी पेंशन ची मागणी करीत आहे, त्यांची ही मागणी रास्त आणि शासन हिताची आहे, नवीन पेंशन ही शेयरमार्केट आधारित स्किम आहे, यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन १०% रक्कम आणि शासन हिस्सा १४% अशी एकूण २४% रक्कम कर्मचारी सेवानिवृत होईपर्यंत दरमाह तिसऱ्याच संस्थेकडे सोपवली जाते, आणि ती संस्था ही रक्कम शेयर मार्केट गुंतवते..
शासनाला दरमाह यावर ३०० कोटि रुपये शासन अंशदान भरावे लागते..

आतापर्यंत शासनाचे जवळपास ४ हजार कोटि रुपये शेयर मार्केट मध्ये गुंतवले गेले आहे, आणि दरमाह हा शेकडो कोटि रूपयांचा खर्च सुरु आहे.. मुळात जो कर्मचारी ३५ वर्षानंतर निवृत होईल त्यांच्या साठी २४% वेतन रक्कम ३५ वर्षे पर्यंत तिसऱ्याच संस्थेकड़े जमा करणे कितपत योग्य आहे..?कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू केल्यामुळे सरकार चे दरमाह शेकडो कोटि रुपये वाचतील शिवाय आधीचे जमा असलेले ३ ते ४ हजार कोटि शासनास परत मिळतील. या रकमेचा वापर करून राज्यातील शेतकरी बांधव आणि अन्य विकासात्मक योजना राबवता येतील..तसेच भविष्यात या सर्व कर्मचाऱ्यांची जुन्या पेंशन अंतर्गत GPF मधे कपात होणारी शेकडो कोटि रक्कम ही शासन खात्यात जमा होईल आणि ही रक्कम देखील शासन वापरू शकेल.. आदी बाबत या निवेदनात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, अजित पवार, यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवावा

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!