नाल्याच्या काठी पंचनाम्यात नमूद केल्याने यावल मंडळ अधिकाऱ्याची हुशारी उघड; प्रांताधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (सुरेश पाटील)। यावल येथील जमीन गट नंबर 693 ला लागून असलेल्या नाल्यात भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून जमीन लाटण्याचा गोरखधंदा असे वृत्त दि 23 मार्च मंगळवार रोजी मंडे टू मंडे ने प्रसिद्ध केले, या वृत्ताची दखल घेत यावल मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करताना रॉ मटेरियल नाल्याच्या काठी टाकून रस्ता करण्यासाठी टाकले आहे असे नमूद करून आपली हुशारी दाखविली आहे.
यावल येथील फैजपुर रोडवर मनुदेवी मंदिराच्या पाठीमागे सोमवार रस्त्यावर नाल्यात गटनंबर 693 च्या बाजूला नाल्यात रॉ मटेरियल टाकून रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने तसेच शासकीय जमीन लाटण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा करताना नाल्यात रॉ मटेरियल टाकलेले असताना तशी पंचनाम्यात नोंद न करता नाल्याच्या काठी रॉ मटेरियल टाकून गटनंबर 693 चा रस्ता करण्यासाठी टाकलेले आहे अशी नोंद पंचनाम्यात करून मंडळ अधिकारी यांनी आपली कायदेशीर पळवाट हुशारी दाखवुन संबंधितांला पुढील कारवाईत वाचविण्याचा केविलवाणी प्रयत्न केलेला आहे. तरी फैजपूर भाग प्रांताधिकारी यांनी यावल तहसीलदार यांच्यामार्फत त्या ठिकाणचा वस्तुस्थिती जन्य पंचनामा करून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह किंवा सार्वजनिक रस्त्यावर रॉ मटेरियल टाकून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुढील कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.