निंभोरा बु.ग्रामपंचायत चे स्वच्छतेकडे दुर्लक्ष..! घाण,दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर..!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)
तालुक्यातील निंभोरा बु !! हे केळी व्यवसायातील नावाजलेले, मार्केट असलेले गावं, बँक ,पोलिस स्टेशन, रेल्वे, बस, असे सर्व सुविधा युक्त गावं, परंतू हे गावं काही समस्यांनी ग्रासलेले आहे.
सविस्तर वृत्त असे की,निंभोरा गावात ” वार्ड क्र.१ कोळीवाडा मध्ये गावातील गटारीचे दुर्गंध युक्त सांडपाणी वाहून वाघोदा खिर्डी मेन रोड वर कोळीवाडा परिसरात येत आहेत याकडे ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना तोंडी सुचना देऊन सुध्दा दुर्लक्ष करत असून याकडे कोणीही लक्ष देत नाही. दुसरीकडे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हा कोरोनाच्या दुसऱ्या लाट च्या महामारी सारख्या आजाराशी लढत असतांना निंभोरा बु कोळीवाडा परिसरातील रहिवाशांना व नागरिकांना आरोग्याची समस्या उत्पन्न होऊन त्याही विरोधात उभे राहून लढावं लागते की काय.? असा ही प्रश्न ही रहिवाशांनमध्ये निर्माण झाला आहे.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर साफ़-सफाई करण्याची मागणी” परिसरातील राहिवासीयांकडून करण्यात येत असल्याने त्या संदर्भात संताप व्यक्त करत रहिवाशी रोहिदास कोळी यांनी सोशल मिडिया वर पोस्ट टाकून आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. तसेच निंभोरा बु.कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी लेखी तक्रार सुद्धा सरपंच/ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे करून नागरिकांना भेडसावणाऱ्या दुर्गंधीयुक्त गटाराचे पाणी व घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने आपण लवकरात-लवकर योग्य ती दखल घ्यावी अशी विनंती करून दाखल न घेतल्यास वार्ड क्र.1 मधील रहिवाशी/नागरिकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रा.वि.अधिकारी/सरपंच यांना निवेदनाद्वारे दिला आहे.