निंभोरा येथील आणखी एक पोलिस कर्मचारी कोरोना बाधित !
निंभोरा (प्रतिनिधी)। येथील कोरोना तपासणी अहवाल निंभोरा सेंटरला आज सकाळी प्राप्त झाले असून अहवालांमध्ये पुन्हा १ पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे
आज स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या गावांतील कोरोना तपासणी अहवालात निंभोरा पोलीस स्टेशनचा एका ५५ वर्षीय कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने आहे. दुसरा कोरोना योध्दा बाधित आढळून आल्याने गावकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गावांतील आजवर एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ४२ झाली आहे, त्यातील ५ रुग्ण उपचार घेत असून गावांतील एकूण प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १५ झाली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याचे दिसत असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांच्या कडुन दुजोरा मिळाला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.