निंभोरा येथे पुन्हा एक रुग्ण बाधित; साखळी तुटता तुटेना !
निंभोरा (प्रतिनिधी)। येथे कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे निंभोरा सेंटर ला सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये गावातील पुन्हा १ रुग्णांना खाजगी लॅबचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे
स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांना आशा होती की गावातील कोरोनाची साखळी तुटणार परंतु आज सकाळी स्थानिक प्रशासनाला गावांतील बलवाडी रोड परिसरातील एका ४७ वर्षीय पुरुषांचा खाजगी लॅब मधील अहवाल कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने परिसरातील चिंता वाढली आहे. निंभोरा येथील एकूण बाधित संख्या ३३ झाली असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांच्या कडुन दुजोरा मिळाला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.