राजकीयरावेर

परेश महाजन यांची चिनावल उपसरपंच पदी निवड कायम –जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

चिनावल ता रावेर :– चिनावल ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक ६ जून २०२० या दिवशी झाली होती त्यात परेश महाजन यांची निवड करण्यात आली होती

सदर हुन प्रतिस्पर्धी उमेदवार तबसुम्बी शेख अजमल यांनी या निवडी विरोधात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती सदरहून प्रस्तुत तक्रारींवर दोन्ही बाजूची म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी यांनी दि ८ ऑक्टोबर रोजी निकाल दिला त्यात तक्रारदार प्रतिस्पर्धी उमेदवार तबसुम्बी शेख अजमल यांचा तक्रारअर्ज नामंजूर करत झालेली उपसरपंच पदाची निवडणूक कायदेशीर ठरवून परेश महाजन हे उपसरपंच पदावर राहण्यास पात्र असल्याचा आदेश काढला . परेश महाजन यांच्या बाजूने ऍड,भास्कर निळे ,रावेर यांनी बाजू मांडत उपसरपंच निवडणूकित लोकनियुक्त सरपंच किती महत्त्वाचे मतदान करू शकतात त्याबाबतीत महाराष्ट्र शासन निर्णयाचा आधार घेत जिल्ह्यात प्रथमच असा ऐतिहासिक निकाल लागल्याने सर्व स्थरातून परेश महाजन व ऍड, निळे यांचे अभिनंदन होत आहे या बाबत भाजपचे पॅनल प्रमुख गोपाळ नेमाडे व योगेश बोरोले यांच्या कडून उपसरपंच परेश महाजन तसेच सरपंच भावना बोरोले व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सहकारी यांचे अभिनंदन करण्यात आले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!