पशू वैद्यकीय अधिकारी यांनी घेतलेल्या मृत कोंबड्याच्या सॅम्पलचे झाले तरी काय ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (भीमराव कोचुरे): गेल्या आठवड्यात खिर्डी खु.या गावात चार ते पाच दिवसात अचानक पणे कोंबड्या मृत झाल्याने त्याचे सॅम्पल तपासणी करिता लॅब ला पाठवलेले असून अद्याप पर्यंत त्याचे रिपोर्ट आलेले नसल्याने पक्षी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोंबड्यांना विषबाधा झाली, की वातावरणातील बदला मुळे मरत आहे की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे.आता ही संख्या जवळ पास १५ ते २०च्या आसपास वाढली असून अद्यापही कोंबड्या मृत का होत आहे याचे नेमके कारण न समजू शकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशू वैद्यकीय अधिकारी यांनी मागील आठवड्यात मेलेल्या कोंबड्याची पाहणी करून मृत कोंबडीचे सँपल तपासणी करीता सोबत घेवून गेले आहे. पण अद्यापही त्या सँपल चा रिपोर्ट आलेला नाही.पशू वैद्यकीय अधिकारी यांनी फक्त लोकांची समजूत काढण्यासाठी सँपल घेतले की काय ? असा प्रश्र्न सध्या कोंबडी पालकांना पडला आहे. तसेच पशू वैदकीय अधिकारी यांनी, मंडे टू मंडे ने प्रकाशित केलेल्या वृतास दुजोरा देत सध्या खिर्डी खु गावात कोंबड्यांचे सर्व्हे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आठ दिवसांपूर्वी स्वतः त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व तेथून तपासणी साठी सँपल घेतले असून लवकरच रिपोर्ट प्राप्त झाल्यास योग्य त्या उपाय योजना केल्या जातील. पशू पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी— डॉ.संतोष वडजे पशू वैद्यकीय अधिकारी खिर्डी
माझे आता पर्यंत सहा ते सात कोंबड्या मृत झाल्या आहेत पशू वैद्यकीय अधिकारी यांनी औषध दिले तरी सुध्दा काही फरक पडत नाही. सँपल चा रिपोर्ट आला नसल्याने मनात भीतीने घर निर्माण केले आहे – दिपक तायडे खिर्डी खु.पशुपालक