पेट्रोल डिझेल दर कमी करा कॉग्रेस तर्फे तहसिलदार यांना निवेदन
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। यावल येथे आज दि 3 जुलै रोजी.तहसिलदार जितेद्र कुंवर याना . यावल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सोनिया गांधी खासदार राहुल गांधी महसूलमंत्री प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात जिल्हाध्यक्ष ॲड संदीप भैय्या पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल डिझेल वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याबाबत निवेदन दिले. जग सध्या कोरोना महामारी ने त्रस्त आहे.या संकटाने लाखो लोकाचे रोजगार हिरावले गेले आहेत.उद्दोक धंदे अजून हि पुवैपदावर आलेलं नाही बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करित आहे अश्या कठीण प्रसंगी पेट्रोल डिझेलच्या महागाई ने आणखी एक संकट लोकांन वर ओढावले आहे या दुहेरी संकटाचा सामना करताना जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे 7जुन 2020पासुन इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असुन देशभरात पेट्रोलच्या किंमती पेक्षा डिझेल चे दर वाढत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निचयांकि पातळीवर असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही.वास्तविक पाहता आतंरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करून देशांतर्गत इधंनाचे दर ठरविले जात असतात परंतु केंद्रीय सरकार सर्व सामान्य जनतेला वेठीला धरून पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून वसुली करण्यात येत आहे सर्व सामान्य जनता दुहेरी संकटात असुन या प्रसंगी हे निवेदन राष्ट्रपती भारत सरकार यांचेकडे सादर करावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी. जिल्हा परिषद चे गटनेते तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे उपस्थित सतीश आबा पाटील शहराध्यक्ष कदीर खान अनु जाती विभाग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला ताई इंगळे राष्ट्रवादी’च्या द्वारका पाटील अमोल भिरूड अल्पसंख्यांक शहराध्यक्ष रेहमान खाटीक पुंडलिक बारी हाजी गफ्फार शहा अनिल जंजाळे मनोहर सोनवणे समीर मोमिन नईम शेख मेंबर बशीर तडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते