पोलीस कान्स्टेबल लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुमित पाटील यांना १५ हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु लाचेच्या प्रकरणामुळे पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ११ जानेवारी रोजी सुमित संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबलला अपघातातील वाहन सोडण्यासाठी वाहन मालकाकडून पंधरा हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन अटक करण्यात आली होती, पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड यांचा सुमीत पाटील हा रायटर असल्याने रायटरने लाच घेतल्याने सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे, लाच घेतली पोलीस कान्स्टेबलने शिक्षा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकला, असच म्हणावं लागेल,