पोलीस प्रशिक्षण केंद्रा प्रकरणी जळगाव जिल्ह्यावर अन्याय – माजी मंत्री एकनाथराव खडसे
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील वरणगाव-हतनूर पोलीस प्रशिक्षण केंद्र कॅबिनेट बैठकीत अहमदनगर येथील जामखेडमध्ये हलविण्याची मंजुरी देण्यात जळ्गावजिल्ह्यात संतापाची लाट आहे. जिल्ह्यातील वरणगाव प्रशिक्षण केंद्रासाठी 1999 या वर्षी 106 एकर जमीन शासनाच्या ताब्यात आर्थिक तरतूद करण्यात आली होती, भूमिपूजन देखील करण्यात आले होते. सरकार बदलले व मागील 15 वर्षांच्या कालखंडात त्याची प्रगती होऊ शकलेली नाही. उलट तिथलं पोलीस प्रशिक्षण केंद्र हे माणिकराव ठाकरे गृह राज्य मंत्री असताना पांढरकवडा येथे हलविले’, होते अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
तसंच, ‘नव्याने पुन्हा एस.आर.पी.ची तुकडी मंजूर करण्याचे ठरविले. 106 एकर जागा वर्ग करण्यात आलेली आहे. आता काम सुरू करण्याची वेळ आलेली असून पोलीस प्रशिक्षण केंद्र हलविण्यात येत असल्याने हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय केला जात असल्याची नाराजी भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.