प्रा.आ.केंद्र हिंगोणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांनी घेतली प्रायव्हेट डॉक्टरांची मिटिंग !
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। प्रा.आ.केंद्र हिंगोणा ता.यावल अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी, न्हावी ग्रामपंतायत कार्यालयात संरपंच सौ. भारतीताई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितित गावातील प्रायव्हे
ट डॉक्टरांची मिटिंग घेतली.सदरील मीटिंग मध्ये कोरोणा सदृश्य लक्षण असलेल्या रुग्णांची लिस्ट, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या व्हाट्सअप गृप मध्ये टाकण्यासंदर्भात सुचना दिल्या. क्वॉरेंटाईन सेंटर मध्ये हाय रीस्क कॉन्टैक्ट व्यक्तिंचा रीपोर्ट निगेटिव्ह येऊन, होम क्वॉरेंटाईन चा व कंटेंन्मेट झोन कालावधी संपल्यावर देखील गावातील नागरीकांकडुन त्यांना साशंक नजरेने बघितल्या जाते. त्यामुळे नागरीकांमध्ये असलेले गैरसमज काढण्याकरीता व क्वॉरेंटाईन राहुन आलेल्या व्यक्तिंचे मनोबल वाढविण्याकरीता, स्थानिक प्रायव्हेट डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा व संबधित व्यक्तिंचे कशा पध्दतीने कॉऊन्सिलिंग करा
वे याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच भविष्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यास गाव पातळीवर आपणास क्वॉरेंटाईन सेंटर उभाराव लागु शकत. त्यामुळे कोरोणावर मात करण्याकरीता स्थानिक प्रायव्हेट डॉक्टरांनी स्वयंस्फुर्तीने या साथरोगाच्या युध्दात आपण सहभागी होऊन रुग्ण सेवा द्यावी असे आव्हाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी केले.
सदरील मीटिंग मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर, सरपंच सौ.भारतीताई चौधरी, ग्रामसेवक श्री. के.आर.देसले, गावातील प्रायव्हेट डॉक्टर – डॉ.चंद्रकांत चोपडे, डॉ.भरत झोपे, डॉ.विलास तळेले, डॉ. अकील, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.विजय झोपे, डॉ.पी.डब्ल्यु.फालक व इतर ग्रामपंतायत सदस्य, आरोग्य सेवक व्ही.एन महाजन, श्री.कैलास कोळी, व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.