भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

बेकायदेशीर कत्तलीसाठी बैलांची वाहतूक करणारे वाहन जप्त

रावेर (प्रतिनिधी)। बेकायदेशीर व विनापरवाना  कत्तलीसाठी २१ बैलांना आयशर वाहनामध्ये दाटीवाटीने गुरांचा जीवास इजा होईल असे कोंबुनकत्तलसाठी घेऊन जात असतांना आढळून आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कर्जोद फाट्याजवळ (एमपी०८जीए-१६७९) या क्रमांकाचे आयशर वाहन २१ बैलांना अतिशय दाटीवाटीने गुरांचा जीवास इजा होईल असे कोंबून घेऊन जात होते. रावेर पोलिसांच्या पथकाने हे वाहन जप्त केले असून यातील अनेक बैल हे जखमी अवस्थेत आढळून आले.  पोलिसांनी हे वाहन व बैलांना जप्त करत यातील बैल हे जळगाव येथील बाफना गो-शाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत. तर आयशयरचा चालक हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला असून या प्रकरणी रावेर पोलीस स्थानकात भाग 5 गु र न-222/2020 कलम-भा द वि क ४२९ सह महा पशु संवर्धन अधि ५(अ)(ब),९ सह महा. पशुक्रृरता अधि.11(1)(A)(F)(H)(K)(I) सहकलम-मु पो का-119 सहकलम-महा.मोटर वाहन अधि.83/177,सहकलम-पशु वाहतुक अधि.-47,48,49(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नितीन डांबरे हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!