भडगाव तालुक्यात भाजपा व विविध धार्मिक संघटनांकडून घंटानाद !
जळगाव (प्रतिनिधी)। भडगाव शहर व तालुक्यात मंदिरे व देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात यावीत, यासाठी विविध मंदिरांच्या बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिक, विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, पुरोहित संघ, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग मोठया प्रमाणात राहिला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, प्रमोद पाटील, अनिल मुरलीधर पाटील शुभम सुराणा, किरण शिंपी, महेंद्र ततार, शेखर बच्छाव,भूषण देवरे, दादा भिला पाटील, शैलेश अरुण पाटील, वाडे, डॉ. संजय महाले, नितीन महाजन, विनोद हिरे, विजय पाटील गिरड, भाऊसाहेब पाटील अंजन विहिरे, जितेंद्र परदेशी पिंपळगाव,यांच्या प्रमुख सहभागाने तालुकाभरात विविध ठिकाणी आंदोलन झाले. यावेळी शहरात मेन रोड मारूती मंदिर, बाजार चौक श्रीराम मंदिर, खालची पेठ हनुमान मंदिर, यशवंत नगर गणेश मंदिर, हनुमान मंदिर तसेच तालुक्यात कजगाव, तांदुळवाडी, वाडे, बोदर्डे, निंभोरा,कनाशी, गिरड, पिंपळगाव, अंजनविहिरे, बांबरुड, भातखंडे, गुढे, शिवणी या गावांमध्ये प्रमुख मंदिर देवस्थानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी करून देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे हि मागणी सर्वजण एकमुखाने करीत असतांनाही, राज्यातील महा विकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही.
ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता आज विविध संघटनातर्फे केल्या गेलेल्या आंदोलनात भडगाव भाजपाचा सक्रिय सहभाग राहिला. यावेळी विहिंपचे नाना हाडपे, पुरोहित संघाचे पुराणिक गुरुजी, बापू व्यवहारे गुरुजी, जगन आप्पा महाजन, शिवाजी नरवाडे,सुरेश नरवाडे, बापू वाघ, मनोहर पाटील, रवि पवार, युवराज पाटील, मनोहर चौधरी, दत्तात्रय पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह तालुका भरातील कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वितेसाठी सहभाग घेतला.