भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

भररस्त्यात गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या !

Monday To Monday NewsNetwork:

पुणे, प्रतिनिधी : येथील एका विवाहित पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाला कंटाळून चिडलेल्या पतीने भररस्त्यात पत्नीचा चाकूने गळा चिरन तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली असून यानंतर पतीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र भावाने समजूत घातल्यानंतर तो पोलिसांपुढे हजर झाला. पुण्यातील हडपसर भागात या धक्कदायक घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीतील कंपनीत इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या नितीन याचा सहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना ४ वर्षांचा मुलगा आहे. पत्नीची वर्तणूक चांगली नसल्याचा व तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यातून पती नितीन त्रस्त होता. पत्नीला अनेकवेळा समजावून सांगूनही ती ऐकत नव्हती. दरम्यान ती आईकडे आली होती. तर नितीनचा भाऊ आजारी असल्याने तो पुण्यात उपचारासाठी आला होता. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. यावेळी नितीन पत्नीला घेऊन जाण्यासाठी म्हणून आईकडे आला.त्याने तिला घरी नेण्यासाठी प्रयत्न केले. पण तीने घराकडे येण्यास नकार दिला. मला मुलगा देखील नको, असे ती म्हणाली. यावेळी नितीनने तिला आपल्याला मुलाला मोठ्या भावाबरोबर गावाकडे पाठवायचे आहे. पण तो भावासोबत जात नाही.

आपण त्याला सोडून येऊ असे सांगून बाहेर आणले. दुचाकीवर ते जात असताना बंटर स्कूलच्या पाठीमागे दुचाकी उभी करून लघुशंका करतो असे सांगून नितीन बाजूला गेला. तिला दुचाकी धरण्यास सांगितले. तिने दुचाकी धरल्यानंतर नितीनने पाठीमागून जाऊन तिचा चाकूने गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण आत्महत्येपूर्वी त्याने भावाला फोन केला. तसेच मी पत्नीचा खून केला आहे. माझ्या मुलाला सांभाळ असे सांगितले. त्यावेळी भावाने त्याची समजूत काढली अन् आत्महत्या करण्यापासून रोखले. त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मग तो पोलीस ठाण्यात हजर झाला घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!