भुसावळजवळ दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू
फैजपुर (प्रतिनिधी)। जळगावला जातांना भुसावळ लगत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी पाडळसा येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी सकाळी दुचाकीव्दारे जळगावला गणेश भागवत राणे (वय ४६) रा. विवरे ता.रावेर हे आणि पत्नी तृप्ती राणे (वय ३६) दोघे जळगाव येथे त्यांच्या काकाचे उत्तरकार्य कार्यक्रमास जात असताना फैजपूर–भुसावळ रस्त्यावर पाडळसा ता. यावल येथील पाटचारी जवळ त्यांची दुचाकी घसरली व त्यात त्यांची पत्नी तृप्ती राणे यांना डोक्याला जबर दुखापत झाली तर गणेश राणेे यांना देखील हाता-पायाला जबर दुखापत झाल्याने दोघांना तात्काळ भुसावळ येथे आणण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले परंतु उपचारापुर्वीचं तृप्ती राणे यांचा मृत्यू झाला. तृप्ती राणे यांचा मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला. तिथे वैद्यकिय अधिकारी डॉ.पी. बी. बारेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.या अपघात प्रकरणी फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.