मद्यधुंद पित्याची लहान मुलगा व मुलीला मारहाण ; दोघे जखमी !
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, प्रतिनिधी : शहरातील जेलरोड परिसरातील एका पित्याने मद्यधुंद अवस्थेत दोन मुलांना मारहाण करून मुलाच्या डोळ्यास व मुलीच्या पायास दुखापत केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पित्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय गोकुळ माळी (वय २७, रा. शिवशक्ती चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अतुल दिलीप कर्डक (रा. इंदिरानगर, कॅनॉल रोड, जेलरोड) यांना मद्याचे व्यसन असून, त्यांनी मद्यधुंद अवस्थेत अथर्व अतुल कर्डक या सात वर्षांच्या मुलाला व अनुषा या चार वर्षांच्या मुलीला मारहाण केली. यावेळी अथर्वच्या डोळ्यास व अनुषा हिच्या पायास दुखापत झाली. या प्रकरणी चाईल्ड लाईन कार्यालयीन टोल फ्री क्रमांक १०९८ वर आलेल्या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी कर्डक यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३२३, तसेच बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०००-७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार मुसळे अधिक तपास करीत आहेत.