भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्यायावल

मद्यधुंद पोलिसांनी अडविले जिल्हा परिषद गटनेत्याचे वाहन, बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर घटना; गुन्हा दाखल !

यावल दि.11(सुरेश पाटील)। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जि.प.जळगांव गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे वाहन अडवून 2 मद्यधुंद पोलिसांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर यावल पोलीस स्टेशन पासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. जळगाव येथील दोन्ही पोलिसांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.10 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद गट नेता प्रभाकर आप्पा सोनवणे हे आपल्या वाहनाने ( वाहन क्र. एम. एच. 19 ए. डब्ल्यू . 3434 ) यावल कडून आपल्या घरी वढोदे या गांवी जात होते यावल मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने कार मधून ( कार क्र.एम.एच.19 बी.यू . 0260 ) असलेले पोलीस कॉन्स्टेबल 416 जितेंद्र रोहिदास पांडव व हेमंत प्रमोद सोळुंके ( पोलीस मुख्यालय जळगाव ) यांनी प्रभाकर सोनवणे यांचे वाहन घडवले तसेच हातात काठी घेऊन शिव्या देत चालक सुनील बिरारी आणि प्रभाकर आप्पा सोनवणे यांना धमकावले सोनवणे यांनी त्यांना बराच समजावण्याचा प्रयत्न केला परंतु दोघ पोलीस दारूच्या नशेत तर्र असल्याने त्यांनी सोनवणे यांना दमदाटी आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी मद्यधुंद पोलिसांना अडविले. दोघ मद्य धुंद पोलिसांना ताब्यात घेतले याप्रकरणी चालक सुनील बिरारी यांच्या फिर्यादीवरून त्या दोघ पोलिसांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.

पोलीस ठाण्यात सुद्धा दमबाजी.
या दोघ मद्य धुंद पोलिसांना यावल पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी फिर्यादीस फिर्याद मागे घे नाही तर तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिली त्यामुळे दोघांपासून जीवाला धोका असल्याचे सुनील बिरारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. जिल्हा परिषद सदस्या सोबत पोलिसांनी अरेरावी केली तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न गटनेता प्रभाकर सोनवणे यांनी उपस्थित केला असून हे दोघे पोलिस रात्रीच्या वेळेस शासकीय कामानिमित्त फिरत होते किंवा इतर खाजगी कामानिमित्त फिरत होते आणि हे कोणाकडे गेले होते याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!