मस्कावद येथील चौदा वर्षाचा चिन्मय पाटील यांचा सायकल वरून पुणे ते मस्कवद प्रवास….
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): मुळगाव मस्कावद तालुका रावेर मात्र कामानिमित्त पुणे येथे स्थाईक झालेले राहुल रवींद्र पाटील यांचा मुलगा चिन्मय राहुल पाटील वय १४, इयत्ता आठवीत डी आय सी किड्स वर्ल्ड निगडी पुणे येथे शिकत असून यावर्षी दिवाळीसाठी गावाकडे जाण्याचा संकल्प करून तो पुणे ते मस्कावद असा प्रवास तब्बल पंचवीस तासात करणार असून तो सध्या औरंगाबाद येथे पोहोचलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की पुणे येथे शिकत असलेला चिन्मय पाटील दिनांक दहा रोजी पुण्यावरून सायकलने मस्कावद येथे येत असून ४५० किलोमीटरचा प्रवास तो २५ तासात पूर्ण करणार आहे. वीस किलोमीटर पर्यंत त्याचे वडील राहुल पाटील यांनी चिन्मय ला सोडण्यासाठी त्याच्यापाठोपाठ. कार ने २० च्या स्पीडने हायवेवरून वीस किलोमीटरचा प्रवास सोबत केला. चिन्मय पाटील यांचा रुढ आत्मविश्वास त्याला सायकलने प्रवास करण्यासाठी भविष्यात कुठल्यातरी रेकॉर्ड करण्याचा संकल्प चिन्मय पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुढे बोलताना तो म्हणाला करोना काळात घरात बसून व क्रोधाच्या दहशत मध्ये जीवन जगून आता या प्रवासामुळे नवचैतन्य निर्माण झालेले आहे. रस्त्यावरील खड्डे तसेच मोठ्या वाहनांच्या ट्रॅफिकला झुंज देत निघालेला हा बालवीर तोंडाला मास व सॅने टायझर वापरून प्रवास करीत आहे. भविष्यात सायकलिंग मध्ये विक्रम करण्याचा मानस असलेला चिन्मय पाटीलांचे मेहनत चिकाटी व धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच १४ वर्षांच्या चिन्मयला एकट्याला प्रवासाची परवानगी देणारे त्यांचे वडील राहुल रवींद्र पाटील. व शासकीय सेवेत असलेली त्याची आई सौ सारिका राहुल पाटील. आजोबा रवींद्र माधव पाटील. भरत रवींद्र पाटील यांचे हिमतील दाद द्यावी लागेल.