भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

मस्कावद मध्ये एक रुग्ण कोरोना बाधित !

मस्कावद ता.रावेर(प्रतिनिधी)।  आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात मस्कावद सिम गावातील एका रुग्णांचा तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे.

गावात मध्यतरी कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला होता मात्र बऱ्याच दिवसांन पडून गावातील कुणीही बाधित आढळून आले नव्हते मात्र आज एका ७४ वर्षीय पुरुषांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आल्याकब निष्पन्न झाल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.सदरील रुग्ण चावडी एरिया पाटील वाडा भागातील रहिवासी असून रुग्ण राहत असलेला परिसर प्रशासनाकडून सिल करण्यात येत असून संपर्कातील ५ व्यक्तीना कॉरटाइन करण्यात आले आहे. आज आलेल्या अहवालामुळे गावात चिंता पसरली आहे. सदरील वृत्तास स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.

मस्कावाद गावातील एकूण बाधित रुग्ण संख्या ५ झाली असून १ रुग्ण उपचार घेत आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!