भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावलराजकीय

महायुतीचे 24 ते 25 पदाधिकारी कार्यकर्ते विरुद्ध गुन्हा दाखल, यावल येथे रस्ता रोको वाहन अडविण्याचा विपरीत परिणाम !

यावल (प्रतिनिधी)। दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी सकाळी 11:10 ते 11: 30 वाजेच्या सुमारास यावल शहरात यावल ते फैजपूर, भुसावळ –चोपडा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत टी पॉईंट भागात महायुतीचे एकूण 24 ते 25 कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करून येणारे जाणारे वाहन अडवून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कोरोना कोविड–19 चे नियमाचे उल्लंघन केले म्हणून 24 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध यावल पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी काल सकाळी 11:10 ते 11:30 वाजेच्या सुमारास यावल येथे भुसावळ टी पॉइंट जवळ रस्ता रोको आंदोलन केले. पो.कॉ. सुशील रामदास घुगे यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की महायुतीचे कार्यकर्ते आरोपी डॉक्टर निलेश सुरेश गडे , रवींद्र सूर्यभान पाटील, अतुल वसंतराव पाटील, सौ. चौधरी, उमेश फेगडे, हेमराज ऊर्फ बाळू फेगडे, मुबारक तडवी, साहील तडवी व इतर 10 ते 12 असे एकूण 24 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दूध उत्पादकाच्या गाईचे दूध 30 रुपये लिटर भाव मिळावा तसेच इतर मागण्यांकरिता यावल शहरात टी पॉईंट जवळ रस्ता रोको करून येणारे जाणारे वाहन अडवून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कोरोना कोविड–19 चे नियमाचे उल्लंघन केले म्हणून 24 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध भाग.5 गु.र.नं. 131/2020 भा.द.वी.341,269,270,188 मु.पो. अक्ट 37 ( 1 ) ( 3 ) चे उल्लंघन 135 प्रमाणे यावल पोस्टेला गुन्हा दाखल केला.पो.नि. अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पो.हे.कॉ. नितीन चव्हाण हे करीत आहे. यामुळे संपूर्ण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात एक जिल्हा परिषद सदस्य, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, इत्यादी एकूण 24 ते 25 महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

निवेदनामुळे संभ्रम
आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात भारतीय जनता पार्टीचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्यासह स्वाक्षरी करणाऱ्या 35 ते 38 कार्यकर्त्यांनी आपली स्वाक्षरी करुन जे लेखी निवेदन दिले आहे त्या निवेदनात रस्तारोको करण्या बाबतचा उल्लेख करण्यात आलेला नाही. रस्ता रोको आंदोलनाचा निवेदनात उल्लेख नसताना यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी आपले कार्यालय सोडून भुसावळ टी पॉइंट जवळ येऊन निवेदन स्वीकारले. याबाबत सुद्धा भारतीय जनता पार्टी तर्फे दिलेल्या निवेदनात बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!