भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

महिलेचा विनयभंग; रावेरात गुन्हा दाखल

रावेर (प्रतिनिधी)। येथील महिलेचा फटाके फोडण्याच्या वादातून विनयभंग केल्याची घटना घडली असून यासंदर्भात एका विरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काल रात्री शहरातील बौध्दवाडा या भागात फिर्यादी  महिलेचा पती फटाके फोडत असतांना तू माझ्या जवळ फटाके का फोडीत आहे ? असे अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली हा बोलला या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले ते सोडविण्यास फिर्यादी महिलेची सासू गेली असता तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याचा तिने विरोध केला असता तिला चापटांनी मारहाण करत सदरील आरोपीने त्यांच्या घरात घुसून पतीस चपटा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादी महिला ही त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता आरोपीने फिर्यादी च्या घरातील विळ्याने फिर्यादिस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या मानेवर तसेच उजव्या हातावर विळ्याने गंभीर घाव करत दुखापत केली. याप्रकरणी अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली (रा. बौद्ध वाडा रावेर) याच्या विरूध्द संबंधीत महिलेने रावेर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसारगु.र.नं. २०७/२०२० भा.द.वी.कलम ३०७, ३५४, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे  तर पोलीस पुढील तपास करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!